भारतीय तद्वज्ञानामध्ये अर्थात भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये योगाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. योगाचा विचार करताना प्रथमतः केवळ आसनांचा विचार केला जातो परंतु मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास योग हे आसनांच्याही पलीकडे आहे. आसनांमुळे आपण शरीरावर नियंत्रण आणू शकतो किंवा शरीराचे नियमन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो.(उदा. आहार, विहार, निद्रा इत्यादी ). त्यामुळेच शरीर आणि मन यातील दुवा