स्वभावाला औषध नसते’, असं म्हणतात…पण औषधपाणी करण्याआधी मुळात हा स्वभावच जाणून घेता आला तर !
स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावाचे हे कंगोरे कसे बरे जाणून घेता येतील, याचा शोध घेत असताना, असे लक्षात आले की मुळात हा सर्व भाग मानसशास्त्राच्या प्रांतात येतो.
मी स्वतः तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी आणि प्राध्यापिका असल्यामुळे मानसशास्त्राचा हा प्रांत माझ्यासाठी अनोळखी नव्हता.परंतु मानसशास्त्राची खोली आणि व्याप्ती लक्षात आल्यावर मानसशास्त्रातील तज्ञ व्यक्ती कडूनच तो भाग शिकलेला केव्हाही चांगले, या उद्देशाने तन्मय जोशी सरांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी Hand Writing Analysis या course ची माहिती दिली.चैतन्य सायकॉलॉजी स्टडी सेंटर या त्यांच्या संस्थेमार्फत सर स्वतः याविषयी मार्गदर्शन करतात, असे त्यांनी सांगितले..
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो.त्याचा स्वभाव, त्याची देहबोली, त्याची विचार करण्याची पद्धत, समोर आलेली परिस्थिती हाताळण्याची त्याची हातोटी या आणि अशा अनेक गोष्टी व्यक्तीनुसार बदलत जातात.हे so called ‘तत्त्वज्ञान’ जरी माहिती असले तरी त्या विशिष्ट व्यक्तीचा आपल्याशी संबंध आल्यानंतर तिच्या वागण्या-बोलण्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम कसा हाताळायचा आणि तेही त्या व्यक्तीला न दुखावता, हे कळतं नव्हते.तसेच अमुक व्यक्ती अशीच का वागते? हे देखील माझ्यासाठी न उलगडलेलं कोडच होतं..
हे कोडं सोडवण्याची एक गुरुकिल्ली जोशी सरांनी Hand Writing Analysis या कोर्सच्या रूपाने मला मिळवून दिली.आपणचं लिहिलेल्या अक्षरांमधून जेव्हा स्वतःचा स्वभाव उलगडू लागला, त्यावेळी या कोर्सची रंगत आणखी वाढत गेली.आपण लिहीत असलेल्या प्रत्येक अक्षरामागे किती स्वभाव छटा दडलेल्या आहेत, हे जाणवले.या कोर्सच्या पहिल्याच दिवशी सर आपल्याला स्वतःच्याच अक्षरात पानभर मजकूर लिहायला सांगतात आणि जसं जसा कोर्स पुढे जातो तसे तसे आपणचं आपल्या स्वभावाचे विश्लेषण करायला लागतो..या सर्व प्रवासात अर्थातच सरांचे मोलाचे मार्गदर्शन असते.
एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यास का प्रवृत्त होते, याची पाळंमुळं तिच्या हस्ताक्षरावरून कशी शोधायची, हे या दरम्यान आम्ही शिकलो.त्याचबरोबर अनेक नामवंत कलाकार, नेते मंडळी अन्य प्रसिद्ध व्यक्ती आणि संस्था यांच्या स्वाक्षरी तसेच नामाकिंत कंपनींचे लोगो आणि संस्था यांच्या logo चे analysis करताना जाणवले, की व्यक्तीच्या आयुष्यात त्याला मिळालेले success किंवा failure हे त्याच्याच सुप्त मनात किती खोलवर जाऊन बसलेले असते आणि या सुप्त भावना, इच्छा केवळ आणि केवळ आपल्या हस्ताक्षरातूनच reflect होत असतात.मात्र ते reflection जोखण्यासाठी या अक्षरांमागची मानसिकता समजून घेता आली पाहिजे, त्यादृष्टीने हा कोर्स खूपच उपयुक्त आहे.
मी P (किंवा कोणतेही अक्षर) असाच काढते, ती माझी style च आहे किंवा मला तशीच सवय आहे, इतका क्षुल्लक दृष्टिकोन आपला आपल्या हस्ताक्षराविषयी असतो…आणि हस्ताक्षराविषयी ही तऱ्हा असेल तर मग स्वभावाविषयी तर बोलायलाच नको..इतके आपण स्वतः बद्दल अनभिज्ञ असतो.
मुळात आत्ताच्या काळात हातानी लिहतोच कोण?आपल्या अनेक क्षमतांपैकी आपण विसरत चाललेली ही एक क्षमता.. पण एकदा खरंच हातात पेन घेऊन लिहून तर बघा, तुमच्या आत दडलेला सुप्त क्षमतांचा खजिना सापडेल कदाचित..आणि अगदी खजिना जरी नाही सापडला तरी आपण किती छान लिहू शकतो, व्यक्त होऊ शकतो, याचे तरी आत्मिक समाधान लाभेल..!
हा कोर्स करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणवली, ती म्हणजे अक्षर सुंदर असले, म्हणजे आपला स्वभावही सुंदरच असेल असे मात्र नाही.माझे अक्षर सुंदर आहे, पण स्वभाव…? तो तुम्ही पारखा आणि त्यासाठी तन्मय जोशी सरांचा हा कोर्स आवर्जून करा..
Priyanka D Kumbhar
Yoga Therapist and Healer
Aarogyam Yoga Chikitsa Kendra, Pune
16priyankakumbhar@gmail.com