सूर्यनारायणाच्या परिवर्तनाचा विचार संक्रांतीमध्ये केला जातो. मात्र, मनाच्या परिवर्तनाच्या दृष्टीनेदेखील ह्या संक्रांतीचा एक वेगळा विचार आपण करू शकतो. रुपारेल महाविद्यालयाचे तत्कालीन प्राध्यापक श्री. केशव विष्णू बेलसरे सर (तर्कशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र ह्या तीनही विषयातील प्रचंड अभ्यास) हे एका संक्रांतीला त्यांचे गुरु गोंदवलेकर महाराज ह्यांच्याशी काही विषयावर चर्चा करत होते. तेव्हा गोंदवलेकर महाराज फार मार्मिकपणे म्हणाले: